'एनएसजी'संदर्भात परराष्ट्र सचिवांचा चीन दौरा

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 जून 2016

नवी दिल्ली - आण्विक इंधन पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी या आठवड्यात चीनचा दौरा केल्याचे वृत्त आज (रविवार) सूत्रांनी दिले. भारताच्या सदस्यत्वासाठी चीनचे मन वळविण्यासाठी जयशंकर यांनी हा दौरा केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. एनएसजीमध्ये भारतास प्रवेश देण्यासंदर्भात चीनचा स्पष्ट विरोध आहे. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी जयशंकर यांच्या या दौऱ्यासंदर्भात माहिती देताना जयशंकर यांच्या या दौऱ्यामध्ये एनएसजीसहच इतर महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाल्याचे स्पष्ट केले. एनएसजीची परिषद येत्या 23-24 जूनला दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेऊल येथे होत आहे. या परिषदेदरम्यान भारताच्या सदस्यत्वासंदर्भात चर्चा केली जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याच वेळी पाकिस्तानच्या सदस्यत्वासंदर्भातही राजनैतिक चर्चा केली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर, जयशंकर यांचा हा दौरा अत्यंत संवेदनशील मानला जात आहे. 

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही गेल्या महिन्यामध्ये चीनचा दौरा केला होता. याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील या महिन्याच्या अखेरीस चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. तेव्हा एनएसजीच्या सदस्यत्वासाठी भारत चीनचे मन वळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे या भेटींमधून स्पष्ट झाले आहे.

Web Title: nsg