एनएसजी - परराष्ट्र सचिव द.कोरियास रवाना

वृत्तसंस्था
बुधवार, 22 जून 2016

नवी दिल्ली - आण्विक इंधन पुरवठादार गटामधील (एनएसजी) भारताच्या सदयत्वास चीन व इतर देशांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर परराष्ट्र सचिव एस जयशंकर हे आज (बुधवार) दक्षिण कोरियास रवाना झाले.

नवी दिल्ली - आण्विक इंधन पुरवठादार गटामधील (एनएसजी) भारताच्या सदयत्वास चीन व इतर देशांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर परराष्ट्र सचिव एस जयशंकर हे आज (बुधवार) दक्षिण कोरियास रवाना झाले.

दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेऊल येथे आयोजित करण्यात आलेल्या एनएसजीच्या संवेदनशील बैठकीदरम्यान भारताच्या सदयत्वासाठी राजनैतिक प्रयत्न करण्याच्या उद्देशार्थ जयशंकर हे दक्षिण कोरियामध्ये दाखल झाले आहेत. एनएसजीमधील सदस्यत्वासंदर्भात इतर देशांकडून पाठिंबा मिळविण्यासाठी भारताकडून अथक राजनैतिक प्रयत्न करण्यात येत असून परराष्ट्र मंत्रालयामधील ज्येष्ठ अधिकारी अमनदीप सिंग गिल हेदेखील याआधीच दक्षिण कोरियामध्ये यासाठी प्रयत्न करत आहेत.

चीनशिवाय तुर्कस्तान, दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि न्यूझीलंड हे देश भारताविरोधात असल्याचे स्पष्ट झाले आहे. अण्विक इंधन पुरवठादार गटामध्ये (एनएसजी) नव्या देशांच्या समावेशासंदर्भात सदस्य देशांमध्ये अद्यापी मतभेद असून सेऊल येथे या आठवड्यामध्ये होणाऱ्या गटाच्या परिषदेदरम्यान नव्या देशांना सदस्यत्व देण्यासंदर्भातील मुद्दा चर्चेसही घेतला जाणार नाही, असे चीनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर होत असलेल्या एनएसजी बैठकीमध्ये परराष्ट्र सचिवांची भूमिका कळीची ठरण्याची शक्‍यता आहे.

Web Title: NSG - Foreign Secretary south koria to leave