निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 'एनएसजी' करणार सुरक्षेत बदल

NSG upgrades security cover of its VIPs
NSG upgrades security cover of its VIPs

नवी दिल्ली- आगामी निवडणुकीचा काळ पाहता अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरवणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेत एनएसजी बदल करणार आहेत. नवीन बदलानुसार गर्दीच्या ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना निकटची सुरक्षा व्यवस्था दिली जाणार आहे.

निवडक अतिमहत्त्वाच्या व्यक्तीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याबरोबरच बहुतांशी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. नव्या बदलानुसार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना प्रचार सभा, पदयात्रेदरम्यान एनएसजी कमांडो हे अतिजवळची सुरक्षा सेवा पुरवणार आहे. अन्यदिवशी एनएसजी कमांडोंची मोबाईल सिक्‍युरिटी संकल्पनेनुसार सुरक्षा पुरवली जाते. व्हीआयपी मंडळींची सावली म्हणून वावरणारे एसपीजी कमांडो हे सफारीच्या वेशभूषेत अंतर्गत आणि बाह्यसुरक्षा पुरवणार आहेत. क्‍लोज प्रोटेक्‍शन फोर्स (सीपीएफ) हे प्रशिक्षित कमांडो असून, ते एसपीजीच्या क्‍लोज प्रोटेक्‍शन टीमप्रमाणे सुरक्षा देतील. ही टीम माजी पंतप्रधान आणि त्यांचे कुटुंबीय तसेच सध्याच्या पंतप्रधानांना निकटची सुरक्षा देत आहेत. 

सध्या एनएसजी कमांडोची सुरक्षा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, गुलाम नबी आझाद, माजी मुख्यमंत्री मायावती, मुलायम सिंह आणि अखिलेश यादव यांना पुरवण्यात आली आहे. विशेष प्रशिक्षित 500 एनएसजी कमांडोंची तीन विभागात विभागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com