"देशातील विमानतळांची संख्या दुप्पट करणार"

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

चेन्नई : देशातील विमानतळांची संख्या पुढील दोन ते तीन वर्षांत दुप्पट करण्यात येणार आहे. देशांतर्गत विमान प्रवासी क्षेत्राच्या वाढीसाठी हे पाऊल उचलले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी रविवारी दिली.

जी. रामचंद्रन स्मृती व्याख्यानात बोलताना सिन्हा म्हणाले, ""भारतीय जनता पक्षाने 2014 च्या जाहीरनाम्यात "उडे देश का आम नागरिक' (उडाण) या योजनेची घोषणा केली होती. याअंतर्गत विमानतळांचा विस्तार करण्यात येत आहे. सध्या देशभरात 75 विमानतळे आहेत. त्यांची संख्या पुढील दोन ते तीन वर्षांत दुप्पट करण्यात येईल. "उडाण'अंतर्गत प्रादेशिक जोडणीसाठी सरकार चारशे कोटी रुपयांचा निधी उभा करीत आहे. देशांतर्गत प्रमुख मार्ग सोडून अन्य प्रादेशिक मार्गावर सेवा देण्यासाठी विमान कंपन्यांच्या बोली मागविण्यात आल्या आहेत. कमी बोली ज्याची असेल, त्या कंपन्यांना हे मार्ग देण्यात येतील.''

केंद्र सरकारने उडाण योजना 1 जुलैला सुरू केली. या योजनेअंतर्गत एका तासाचा विमान प्रवासासाठी अडीच हजार रुपयांची तिकीट मर्यादा ठेवण्यात आली. देशांतर्गत प्रवास करणाऱ्या सामान्य माणसाच्या आवाक्‍यात विमान सेवा यावी, यासाठी सरकारने तिकिटांची किमतीवर मर्यादा ठेवली आहे. प्रादेशिक मार्गांना या योजनेत प्राधान्य दिले जाणार आहे.

Web Title: number of airports to be doubled