कोट्यधीशांची संख्या इन्फोसिसमध्ये वाढतेय 

वृत्तसंस्था
Thursday, 4 June 2020

देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसमधील कोट्यधीश कर्मचाऱ्यांची संख्या आर्थिक वर्ष२०१९-२०मध्ये ७४वर पोचली आहे.आर्थिक वर्ष २०१८-१९मध्ये इन्फोसिसमधील कोट्यधीश कर्मचाऱ्यांची संख्या ६४ इतकी होती.

नवी दिल्ली - देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसमधील कोट्यधीश कर्मचाऱ्यांची संख्या आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ७४ वर पोचली आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये इन्फोसिसमधील कोट्यधीश कर्मचाऱ्यांची संख्या ६४ इतकी होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कंपनीचे कोट्यधीश कर्मचारी उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष पदांवरील आहेत. आर्थिक वर्ष २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१९-२० मध्ये या कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ झाली आहे. यात कंपनीकडून शेअरच्या स्वरुपात मिळालेल्या भत्त्यांचे मोठे मूल्य आहे. इन्फोसिसच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. 

या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनात निश्चित वेतन, बदलते वेतन, शेअर आणि निवृत्तीनंतरचे लाभ यांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये या कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी १० टक्क्यांची वाढ म्हणजेच ६.८ लाखांची वाढ झाली आहे. तर त्याआधीच्या वर्षात वेतनातील सरासरी वाढ ६.२ टक्के इतकी होती. कंपनीच्या भारतातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वार्षिक वाढ सरासरी ७.३ टक्के इतकी होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख आणि सीओओ यू.बी.प्रवीण राव यांच्या वेतनाचे एमआरईबरोबरचे गुणोत्तर अनुक्रमे ५०२ ते १५५ इतके आहे. इन्फोसिसमधील इतर वरिष्ठ पदांवरील व्यक्तींचे वेतन मात्र वाढलेले नाही. या कर्मचाऱ्यांना सरलेल्या आर्थिक वर्षात बढतीदेखील मिळालेली नाही. सरलेल्या आर्थिक वर्षात अनेक व्यवस्थापकीय पदावरील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात आलेली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of billionaires is increasing in Infosys

Tags
टॉपिकस
Topic Tags: