देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 49 लाखांच्या पार; मनीष सिसोदिया यांना कोरोनाची बाधा

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 15 September 2020

देशात कोरोनाची साथ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाची बाधा सर्वसामान्यांसह बऱ्याच सेलिब्रिटी आणि राजकारणींना झाली आहे. यात आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ( Manish Sisodia) यांची भर पडली आहे. सिसोदिया यांनी सोमवारी केलेली कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

 नवी दिल्ली: देशात कोरोनाची साथ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाची बाधा सर्वसामान्यांसह बऱ्याच सेलिब्रिटी आणि राजकारणींना झाली आहे. यात आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ( Manish Sisodia) यांची भर पडली आहे. सिसोदिया यांनी सोमवारी केलेली कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

'रविवारी रात्रीपासून त्यांना ताप होता. त्याअगोदर सिसोदिया विधानसभेच्या अधिवेशनातही गेले नव्हते. ' मला सुरुवातीला हलका ताप आला होता. त्यामुळे मी कोरोना चाचणी केली होती, जी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला अलगीकरण केलं आहे. सध्या ताप किंवा इतर कोणतीही मला समस्या नाहीये. मी पूर्णपणे ठीक आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादांमुळे मी लवकरच कामावर परत येईन, अशी माहिती उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करून दिली आहे. 

 

मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 83 हजार 809 नवीन रुग्णांचं निदान होऊन 1,054 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील कोरोनाची बाधा झालेल्यांचा आकडा 49 लाखांच्या वर गेला आहे. देशात आातपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यांचा आकडा 49 लाख 59 हजार 400 वर गेला आहे. तर सध्या देशात कोरोनाचे 9 लाख 90 हजार 61 कोरोना रुग्ण सक्रिय असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) दिली आहे. 

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतातील कोरोना रिकव्हरी रेट 78 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. भारतात आतापर्यंत 37.8 लाख लोकांनी कोरोनावर आतापर्यंत मात केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दुसऱ्या बाजूला जगाचा विचार केला तर, 19 दशलक्ष लोक कोरोनातून बरे झाले आहेत.  भारताने कोरोनाच्या रिकव्हरी रेटमध्ये ब्राझीलला मागं टाकलं आहे. भारतात आतापर्यंत 37 लाख 80 हजार 107 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. 

देशात 14 सप्टेंबरपर्यंत कोरोनाच्या 5 कोटी 83 लाख 12 हजार 273 चाचण्या झाल्या आहेत. तर काल एका दिवसात 10 लाख 72 हजार 854 जणांची कोरोना चाचणी घेतल्याची माहिती  भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने ( Indian Council of Medical Research ) दिली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona patients in the country has crossed 49 lakh