esakal | Corona Updates:देशातील कोरोना रुग्णांची संख्या 59 लाखांच्या वर
sakal

बोलून बातमी शोधा

corona

दिल्लीतील वाढते कोरोनाचे रुग्ण पाहता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाची दुसरी लाट आल्याचे म्हटलं आहे. परंतु  केजरीवाल यांच्या दाव्याला केंद्र सरकारने नकार दिला आहे.

Corona Updates:देशातील कोरोना रुग्णांची संख्या 59 लाखांच्या वर

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: जगभरासह देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मागील 24 तासांत 85 हजार 362 कोरोना (COVID19) रुग्णांची भर पडली असून 1,089 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशाती कोरोनाग्रस्तांची संख्या 59 लाखांच्या वर गेली आहे. दिल्लीतील वाढते कोरोनाचे रुग्ण पाहता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाची दुसरी लाट आल्याचे म्हटलं आहे. परंतु  केजरीवाल यांच्या दाव्याला केंद्र सरकारने नकार दिला आहे. 

मागील 24 तासांतील देशातील 1,089 कोरोना रुग्णांचे मृत्यू धरून आतापर्यंत देशातील कोरोनाने मृत झालेल्यांचा आकडा 93 हजार 379 वर गेला आहे. तर आतापर्यंत 59 लाख 3 हजार 933 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्यातील 48 लाख 49 हजार 585 जण कोरोनामुक्त (cured/discharged/migrated) झाले आहेत. तसेच 9 लाख 60 हजार 969 कोरोनारुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) दिली आहे.

 Happy Birthday - भारताच्या अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह

देशातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढल्याचे दिसत आहे. सध्या देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 81.74 टक्क्यांपर्यंत गेला आहे. देशात 7 ऑगस्टला कोरोना झालेल्यांची संख्या 20 लाखांपेक्षा अधिक होती. त्यानंतर 23 ऑगस्टला 30 लाख, 5 सप्टेंबरला 40 लाख आणि 16 सप्टेंबरला 50 लाखांच्या वर गेली होती. आताचा कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता उद्यापर्यंत कोरोनाग्रस्तांचा देशातील आकडा 60 लाखांच्यावर जाईल असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

 Petrol Price Today - सप्टेंबरमध्ये पेट्रोल आणि डिझेल झालं स्वस्त; आजचे दर किती?

वाढता कोरोनाचा प्रसार पाहून सरकारने कोरोनाच्या प्रतिदिन चाचण्याही वाढवल्या आहेत. शुक्रवारी एका दिवसात देशात कोरोनाच्या 13 लाख 41 हजार 535 टेस्ट सापडल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत देशातील 7 कोटी 2 लाख 69 हजार 975 टेस्ट झाल्याची माहिती आयसीएमआरने ( Indian Council of Medical Research) दिली आहे. 

(edited by-pramod sarawale)

loading image
go to top