शबरीमलावर दर्शनासाठी भाविकांचा महापूर

पीटीआय
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

शबरीमलावरील अय्यप्पा स्वामींचे मंदिर शनिवारी (ता. 16) सायंकाळी खुले झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली. 

शबरीमला (केरळ) : शबरीमलावरील अय्यप्पा स्वामींचे मंदिर शनिवारी (ता. 16) सायंकाळी खुले झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली. मंडल-मकरविलक्कु पूजाविधी उत्सवासाठी मंदिर दोन महिने खुले राहणार आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

देवस्थानचे मुख्य पुजारी ए. के. सुधीर नंबुद्री यांनी आज पहाटे तीन वाजता मंदिराच्या गाभाऱ्याची दारे उघडल्यानंतर हजारो भाविकांनी दर्शन घेत खास पूजा केली. मल्याळी "वृश्‍चिकोम' महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिर खुले झाले. त्या वेळी देवस्वम मंत्री कडकमपल्ली सुरेंद्रन, त्रावणकोर देवस्वम मंडळाचे (टीडीबी) अध्यक्ष एन. वासू आदी उपस्थित होते.

मराठी अस्मितेचा हुंकार म्हणजे बाळासाहेब ठाकरे : शरद पवार

यात्रा काळात मंदिर 27 डिसेंबरपर्यंत खुले राहील. त्यानंतर तीन दिवस ते बंद करण्यात येईल. मकरविलक्कु उत्सवासाठी मंदिर पुन्हा 30 डिसेंबरला खुले केले जाईल व 20 जानेवारीला पुन्हा बंद करण्यात येईल. कडकमपल्ली सुरेंद्रन यांनी आज विविध मंत्रालयांतील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. 

न्यायालयाच्या निर्णयानुसार कृती

दरम्यान, शबरीमला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेशास परवानगी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 28 सप्टेंबरच्या आदेशाला वास्तविक स्थगिती देण्यात आलेली आहे. न्यायालयाच्या निकालाच्या आधारेच राज्य सरकार पाऊल उचलेल, असे केरळचे कायदामंत्री ए. के. बालन यांनी रविवारी स्पष्ट केले.

या प्रकरणात घटनात्मक सरकारला न्यायालयाच्या आदेशानुसारच कृती करावी लागणार आहे. आता आमच्यापुढे नवी समस्या उभी राहिली आहे ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने 14 नोव्हेंबरला दिलेल्या निर्णयाने आधीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे की नाही. कायद्यानुसार ती दिली नसली तरी वास्तविक ती स्थगितीच आहे, असे बालन म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of Devotees increased in sabarimala