इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे बलात्काराच्या प्रमाणात वाढ: भाजपा खासदार

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जुलै 2018

खंडवा : मध्यप्रदेशमधील मंदसौर येथे 7 वर्षांच्या मुलीवरील झालेल्या बलात्काराच्या घटनेचे पडसाद आता सर्वत्र उमटत आहेत. यावरुन राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. या घटनेबद्दलेच मत विचारले असाता भाजपा खासदार नंदकुमार चौहान यांनी इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे बलात्काराचे प्रमाण वाढले असल्याचे म्हटले आहे. 

स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे आजकालच्या पिढीला सहज अश्लिल व्हिडिओ बघायला मिळतात. याचाच प्रभाव या पिढीच्या मनावर पडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यावेळी सायबर सेल अताना अशा गोष्टीवंर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता. अशा बारिक गोष्टींवर लक्ष ठेवणे त्यांना शक्य नसल्याचे चौहान यांनी म्हटले आहे. प्रत्येकाच्या मोबाईलपर्यंत पोचणे त्यांना शक्य नसल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Web Title: number of increases due to internet and smartphone said bjp mp