भारतात कुपोषितांची संख्या घटली; किती ते वाचा सविस्तर

पीटीआय
बुधवार, 15 जुलै 2020

भारतातील कुपोषितांची संख्या गेल्या दशकभरात सहा कोटींनी घटली असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) अहवालात म्हटले आहे. देशात शरीराची वाढ खुरटलेल्या मुलांची संख्या कमी आहे, मात्र त्याचबरोबर स्थूल प्रौढांची संख्या वाढत आहे, याकडे लक्ष वेधले आहे.

न्यूयॉर्क - भारतातील कुपोषितांची संख्या गेल्या दशकभरात सहा कोटींनी घटली असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) अहवालात म्हटले आहे. देशात शरीराची वाढ खुरटलेल्या मुलांची संख्या कमी आहे, मात्र त्याचबरोबर स्थूल प्रौढांची संख्या वाढत आहे, याकडे लक्ष वेधले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संयुक्त राष्ट्रांनी ‘द स्टेट ऑफ फुड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड’ हा अहवाल सोमवारी प्रसिद्ध केला. त्यात म्हटले आहे की २०१९ मध्ये संपूर्ण जगात ६९ कोटी लोक कुपोषित किंवा उपाशी होते. २०१८ पेक्षा ही संख्या एक कोटीपेक्षा जास्त आहे. भूक आणि कुपोषणाची समस्या नष्ट करण्यासाठी जगभरात सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेणारा अधिकृत अभ्यासाचा आधार अहवालात घेण्यात आला आहे.

Image may contain: text

भारत व चीनमध्ये सकारात्मक बदल
चीन व भारत या पूर्व व दक्षिण आशियातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्था असून या दोन्ही देशांत कुपोषणाचे प्रमाण घटले आहे. भिन्न परिस्थिती, इतिहास आणि प्रगतीचा दर वेगवेगळा असूनही या देशांमध्ये कुपोषितांच्या संख्येत घट होणे ही उल्लेखनीय बाब आहे, असे अहवालात नमूद केले आहे.

'फेसबुक सोडता येत नसेल तर राजीनामा द्या', हाय कोर्टाने लेफ्टनंट कर्नलला सुनावले 

देशात १४ टक्के कुपोषित
भारतात कुपोषितांची संख्या ६ कोटींपेक्षा कमी झाली आहे. २००४ ते २००६ या दरम्यान भारतात २४. ९४ कोटी लोक कुपोषित होते. ही संख्या कमी झाली असून २०१७-१९ या काळात ती १८. ९२ कोटी नोंदविली गेली. भारताच्या लोकसंख्येचा विचार करता यात ७ टक्के घट झाली आहे. २००४ ते २००६ मध्ये हे प्रमाण २१.७ टक्के होते तर २०१७-१९ मध्ये ते १४ टक्क्यांपर्यंत खाली आले. 

भुकेलेल्यांची वाढती संख्या 

  • भुकेची समस्या ही आशिया खंडात जास्त असली तरी आता आफ्रिकी देशात त्याचे वाढते प्रमाण
  • आफ्रिकेतील १९.१ टक्के जनता कुपोषित असतील
  • आत्ताच्या स्थितीनुसार २०३० पर्यंत जगातील एकूण भुकेल्यांपैकी निम्‍मे लोक आफ्रिकेतील असतील.
  • कोरोनामुळे २०२०च्या अखेरपर्यंत जगभरात १३ कोटींपेक्षा जास्त लोकांना तीव्र भुकेचा सामना करावा लागणार

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of malnutrition people in India has decreased