नर्सरीचे अ‍ॅडमिशन यावर्षी रद्द? कोरोनाचा लहान मुलांना फटका

school.
school.

नवी दिल्ली- कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी लोकांमध्ये भीती कायम आहे. पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी कचरत आहेत. कोरोना संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्यामुळे यापुढेही शाळा ऑनलाईन पद्धतीनेच सुरु राहण्याची शक्यता आहे. 

टेलिग्राम वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे? CEO नी केली मोठी घोषणा

दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodiya) यांनी जुलै अगोदर शाळा सुरु होण्याची शक्यता नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये नर्सरी अ‍ॅडमिशन (Nursery Admission) रद्द होण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकार याबाबत नवीन निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. तसेच खासगी शाळांनाही यासंबंधी प्रस्ताव पाठवला जाणार आहे. 

दिल्ली सरकारने जूलैनंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला, तरी लहान मुलांना सर्वात शेवटी शाळेत बोलावले जाणार आहे. त्यामुळे लहान मुलांचं 2021 वर्ष घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेण्यात जाणार असल्याची शक्यता आहे. सिसोदिया यांनी या संदर्भात माहिती दिली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना संकटात न टाकता शाळा सुरु करणे आणि परीक्षा घेणे हे आमचे लक्ष्य असल्यातं ते म्हणाले आहेत. त्यामुळे नर्सरीचे अ‍ॅडमिशन रद्द केले जाऊ शकतात. 

मोदींनी सांगितलेली साडीच्या पदराची गोष्ट खोटी; तृणमूल काँग्रेसनं भाषणावर घेतला...

कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. असे असले तरी कोरोना लशीची चाहूल लागली आहे. पण, जूलै महिन्यापर्यंत लस सर्वांना मिळण्याची शक्यता कमी आहे. लसीकरण टप्प्या-टप्प्याने सुरु होणार असून सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून सरकार जूलैपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेऊ शकते. कोरोना महामारीचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचं दिसतंय. 

मंगळवारी दिल्लीत 803 कोरोना रुग्ण आढळले. गेल्या चार महिन्यात पहिल्यांदाच रुग्णांचा आकडा 1 हजाराच्या खाली आला आहे. तसेच कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असे असले तरी पुढील काही दिवसांत स्थिती कशी राहते यावर पुढची वाटचाल ठरणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com