नुतन यांना गुगलकडून डुडलद्वारे श्रद्धांजली

वृत्तसंस्था
रविवार, 4 जून 2017

या डुडलमध्ये गुगल या शब्दातील दोन "ओ'मध्ये नुतन यांच्या चेहऱ्याच्या हसऱ्या, दुःखी व नाट्यमय अशा छटा दाखवण्यात आल्या आहेत. 1936 मध्ये जन्माला आलेल्या नुतन समर्थ यांनी त्यांच्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 70 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. 

मुंबई - बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री नुतनच्या 81व्या वाढदिवसानिमित्त आज (रविवार) गुगलने आपल्या डुडलद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

या डुडलमध्ये गुगल या शब्दातील दोन "ओ'मध्ये नुतन यांच्या चेहऱ्याच्या हसऱ्या, दुःखी व नाट्यमय अशा छटा दाखवण्यात आल्या आहेत. 1936 मध्ये जन्माला आलेल्या नुतन समर्थ यांनी त्यांच्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 70 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. 

2011 पर्यंत सर्वोत्तम नायिकेसाठी पाच फिल्मफेअर पुरस्कार जिंकणाऱ्या नुतन या एकमेव अभिनेत्री होत्या. 2011 मध्ये त्यांची बहीण तनुजा मुखर्जी यांची मुलगी काजोल हिने त्यांची बरोबरी केली. नुतन यांचा1959 मध्ये रजनिश बहेल यांच्याशी विवाह झाला. वयाच्या 54 व्या वर्षी 21 फेब्रुवारी 1991 रोजी स्तनच्या कर्करोगाने त्यांचा मृत्यू झाला. 

अनारी, कर्म और नाम यांसारख्या व्यावसायिक दृष्टिकोनातून यशस्वी ठरलेल्या सिनेमांव्यतिरिक्त त्यांनी बंदिनी आणि सुजाता यांसारख्या समीक्षकांनी प्रशंसा केलेल्या सिनेमांमध्येही काम केले. नुतन यांचा मुलगा मोहनिश बहेल हा चित्रपट व छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांत नायक म्हणून काम करतो. नुतन यांना 1974 मध्ये भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. 

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
संप मिटल्यामुळे काहींची दुकाने बंद: चंद्रकांत पाटील
लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले; 7 ठार
लंडन स्फोट : भारतीय संघाची सुरक्षा वाढविली
मुंबई-गोवा मार्गावर अपघातात 2 जण ठार
रेयाल माद्रिदने पटकाविले चँपियन्स लीगचे विजेतेपद
सांगली, कोल्हापूरला भूकंपाचा सौम्य धक्का​
नाशिकमध्ये शेतमालासाठी 'सुरक्षित कॉरिडॉर'​
'''महाराष्ट्र बंद' उद्या होणारच; संप मिटलेला नाही''​
'आश्‍वासने न पाळल्याने तावडेंनी राजीनामा द्यावा'​

Web Title: Nutan: Google celebrates her 81st birthday with a doodle