
N.V.Ramana: न्याय मिळवणे हे 'सामाजिक मुक्तीचे साधन'
सरन्यायाधीश एन. व्ही. रामन यांनी न्याय मिळवणे हे 'सामाजिक मुक्तीचे साधन' आहे असे म्हटले आहे. त्यांनी शनिवारी सांगितलेकी लोकसंख्येचा फारच कमी भाग न्यायालयापर्यंत पोहचतो आणि बहुतेक लोक जागरूकता आणि आवश्यक साधनांअभावी शांतता बाळगून त्रास सहन करतात.
सरन्यायाधीश रमण हे अखिल भारतीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या वेळी ते म्हणाले की लोकांना सक्षम बनवण्या साठी तंत्रज्ञान मोठी भुमिका बजावत आहे. त्यांनी न्यायव्यवस्थेतुन 'न्याय मिळण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब' करण्याचे आवाहन केले.
समाजातील भेदभाव दूर करण्याच्या उद्देशाने आधुनिक भारताची उभारणी करण्यात आली आहे. लोकशाही म्हणजे सर्वांच्या सहभागासाठी मंच उपलब्ध करून देणे आहे . हा सहभाग सामाजिक मुक्तीशिवाय शक्य होणार नाही.
न्याय मिळवणे हे सामाजिक मुक्तीचे साधन आहे,देशातील अधिकार्यांचा हस्तक्षेप आणि सक्रिय यांचा विचार करणे आवश्यक आहे.
हेही वाचा: PM Kisan Fund: ‘या’ तारखेदरम्यान जमा होणार १२वा हप्ता
त्यांनी सांगीतल की प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायाधीश यांच्यानुकत्याच झालेल्या परिषदेतही हा मुद्दा उपस्थित करणे योग्य होते. भारत हा देशातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश आहे, आणि त्यांच्याकडे प्रचंड कर्मचारी आहेत. परंतु एकूण कर्मचार्यांपैकी केवळ 3% कुशल असल्याचा अंदाज आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या न्याय वितरण व्यवस्थेचा कणा असल्याचे मुख्य न्यायमूर्तींनी जिल्हा न्यायव्यवस्थेचे अस वर्णन केले.
Web Title: Nvramana Achieving Justice Means Social Emancipation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..