'जेएनयू'त पुन्हा राडा; स्वामी विवेकानंदाच्या पुतळ्याची विटंबना!

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

गेल्या पंधरा दिवसांपासून 'जेएनयू'मध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. फी वाढ आणि वसतीगृहाच्या नियमांमध्ये केलेल्या बदलांविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयु) उद्घाटनापूर्वी स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. पुतळ्याची विटंबना केल्यानंतर त्याच्याखाली भाजपविरोधात अपशब्द लिहण्यात आले आहेत. हा प्रकार कोणी केला आहे याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

गेल्या पंधरा दिवसांपासून 'जेएनयू'मध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. फी वाढ आणि वसतीगृहाच्या नियमांमध्ये केलेल्या बदलांविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या आंदोलनाचे पडसाद गुरुवारी पुन्हा दिसून आले आहेत.

- महाशिवआघाडीचा गुंता सुटला?; शरद पवार-सोनिया गांधी अंतिम बैठक

या आंदोलनादरम्यान स्वामी विवेकानंदाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. यानंतर भाजपचे खासदार राकेश सिन्हा यांनी आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 

- बुलंद भारत की बुलंद तस्वीर; बजाजची इलेक्ट्रिक 'चेतक' लाँच; काय आहेत फिचर्स?

दुसरीकडे, एनएसयूआय या विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की जेएनयूचे विद्यार्थी असे काम करू शकत नाहीत.

- Chandrayaan 2 : 'चांद्रयान 2'ने पाठवले चंद्रावरील विवराचे थ्रीडी छायाचित्र!

यावेळी एनएसयूआयचा सदस्य सनी धीमान म्हणाला, आम्ही या घटनेचा निषेध करतो. जेएनयूमध्ये विवेकानंदांच्या पुतळ्याची तोडफोड केली नसून फक्त त्याच्या कठड्यावर अपशब्द लिहिण्यात आले आहेत. मला वाटत नाही की, जेएनयूचा कोणताही विद्यार्थी अशा प्रकारचे कृत्य करू शकेल. आता आम्ही ते स्वच्छ केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Objectionable messages found written at base of Swami Vivekananda statue at JNU Delhi