सरकारी प्रेझेंटेशन सुरू असताना सुरू झाला पॉर्न व्हिडिओ

obscene video played during rajasthan secretariat meeting
obscene video played during rajasthan secretariat meeting

जयपूर : राजस्थान सरकारच्या अधिकाऱयांची बैठक सुरू असताना पॉवर प्रेझेंटेशन सुरू असताना अचानक पॉर्न व्हिडिओ सुरू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली.

अन्न पुरवठा विभागातील मुख्य सचिव मुग्धा सिन्हा यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी स्क्रीनवर पॉवर प्रेझेंटेशन दाखवले जात होते. स्क्रीनवर अचानक पॉर्न व्हिडिओ सुरू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. 15 सेकंद व्हिडिओ सुरू होता. अधिकाऱयांच्या बैठकीदरम्यान पॉर्न व्हिडिओ सुरू झाल्यामुळे काही वेळासाठी बैठक थांबविण्यात आली होती. सरकारी अधिकाऱयांच्या बैठकीदरम्यान पॉर्न व्हिडिओ कसा सुरू झाला, याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

'एक अधिकारी आपल्या लॅपटॉपवरून प्रेझेंटेशन दाखवत असताना अचानक व्हिडिओ पॉपअप झाला. व्हिडिओवर क्लिक झाल्यामुळे तो प्ले झाला. स्क्रीनवर व्हिडिओ दिसू लागल्यामुळे अधिकारी गोंधळून गेला. अखेर 15 सेकंदानंतर व्हिडिओ बंद करण्यात आला,' अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com