अल्पवयीन मुलाने आईचा मृतदेह नेला सायकलवरून...

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 जानेवारी 2019

भुवनेश्वर: येथील करपाबाहाल गावातील एका 17 वर्षीय मुलाला आपल्या आईचा मृतदेह सायकलवरून अंत्यसंस्कारासाठी न्यावा लागल्याची खळबळजणक घटना घडली असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला आहे.  

ओडिशात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेमागचे कारण आहे जाती व्यवस्था. कनिष्ठ जातीमधील महिला असल्यामुळे शेजारी राहणाऱया नागरिकांनी अत्यंसंस्कारासाठी मदत नाकारली. यामुळे अल्पवयीन मुलाने सायकलवरून आईचा मृतदेह नेला.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जानकी सिन्हानिया (वय 45) या पाणी भरण्यासाठी गेल्या असताना पाय घसरून पडल्या. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगा सरोज (वय 17) याने शेजारी राहणाऱया नागरिकांकडे मदतीची याचना केली. परंतु, जाती व्यवस्थेमुळे कोणीही मदतीला पुढे आले नाही. यामुळे सरोजने आईचा मृतदेह सायकलवर ठेवला व चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत मृतदेह नेला. जंगलामध्ये त्याने मृतदेहाचे दफन केले. जानकी या आपला मुलगा व मुलीसह गेल्या दहा वर्षांपासून गावात रहात होत्या.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली. झारसुगुदाचे जिल्हाधिकारी बिभुती भुषण पटनाईक यांनी या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Odisha boy carries dead mother on bicycle after villagers refuse to help because of caste