ओडिशात सुरुंग स्फोटात 7 पोलिस हुतात्मा

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

ओडिशात पंचायतीच्या निवडणुका होणार असून, त्यापूर्वी हा हल्ला झाला आहे. परिसरात माओवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे.

भुवनेश्वर - ओडिशातील कोरापूट जिल्ह्यात बुधवारी रात्री माओवाद्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस सुरुंग स्फोटात उडविल्याने 7 पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले असून, 20 जण जखमी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशा-आंध्र प्रदेश सीमेवर कोरापूट जिल्ह्यातील सुंकी येथे माओवाद्यांकडून स्फोट घडवून आणण्यात आला. बुधवारी रात्री ही घटना घडली असून, हा स्फोट एवढा भीषण होता की बसचे छत उडून गेले. हे सर्व पोलिस कर्मचारी प्रशिक्षणासाठी कटक येथे जात होते. जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

ओडिशात पंचायतीच्या निवडणुका होणार असून, त्यापूर्वी हा हल्ला झाला आहे. परिसरात माओवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे.

Web Title: Odisha: Death toll in Koraput landmine blast climbs to seven