ओडिशात नक्षलवाद्याला अटक

पीटीआय
गुरुवार, 6 जुलै 2017

भुवनेश्‍वर - सुनकीघाट भूसुरुंग स्फोटात हवा असलेल्या एका नक्षलवाद्याला ओडिशाच्या गुन्हे शाखेने आज अटक केली. यंदा फेब्रुवारीत करण्यात आलेल्या स्फोटात आठ पोलिस कर्मचारी ठार झाले होते. मदाबी बांदी असे याचे नाव आहे.

यंदा फेब्रुवारीत सुनकी घाट येथे नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाचा स्फोट घडविला होता, अशी माहिती गुन्हे शाखेचे महासंचालक बी. के. शर्मा यांनी ट्विटच्याद्वारे दिली. शर्मा म्हणाले की, नक्षलवाद्यांना पोलिसांच्या वाहनाला लक्ष केले होते. मात्र, या नक्षलवाद्याला कोठे अटक करण्यात आली त्याची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. अटक करण्यात आलेला नक्षलवादी हा छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे सक्रिय होता. त्याच्यावर चार लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. या नक्षलवाद्याला उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आल्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली.

Web Title: odisha news marathi news sakal news india news naxal arrested