लग्न करुन परतताना मोठी दुर्घटना; कालव्यात वाहन कोसळून 7 वऱ्हाडींचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी I Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wedding

या हृदयद्रावक घटनेत अन्य चार जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Accident : लग्न करुन परतताना मोठी दुर्घटना; कालव्यात वाहन कोसळून 7 वऱ्हाडींचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

ओडिशातील संबलपूर जिल्ह्यात (Odisha Sambalpur) एक हृदयद्रावक घटना समोर आलीये. कालव्यात वाहन कोसळल्यामुळं वराच्या बाजूचे सात जण ठार, तर चार जण जखमी झाले आहेत.

ही घटना आज (शुक्रवार) पहाटेची असल्याचं सांगण्यात येत आहे. संबलपूर जिल्ह्यात वाहन अंगावर पडल्यामुळं सात जणांचा मृत्यू झालाय. या हृदयद्रावक घटनेत अन्य चार जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

अजित खमारी, दिव्या लोहा, सरोज सेठ, सुमंत भोई, सुबल भोई आणि रमाकांत भोई अशी मृतांची नावं आहेत. सातव्या मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना संबलपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, झारसुगुडा जिल्ह्यातील लद्दारा गावातून वराचे कुटुंबीय आणि नातेवाईकांना घेऊन जाणारं वाहन गुरुवारी संध्याकाळी संबलपूरमधील परमपूर भागात गेलं होतं. रात्रीचं जेवण आटोपून वराच्या पक्षातील काही सदस्य एसयूव्हीमधून घरी परतत होते. यादरम्यान चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि पहाटे दोनच्या सुमारास वाहन कालव्यात कोसळलं. सध्या पोलिस याबाबच चौकशी करत आहेत.