रेल्वे मंत्र्यांनी गाजावाजा केलेलं 'कवच' गेलं कुठं? ओडिशातील ट्रेन अपघातावेळी नेमकं काय घडलं? : Odisha Train Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashwini Vaishnav

Odisha Train Accident: रेल्वे मंत्र्यांनी गाजावाजा केलेलं 'कवच' गेलं कुठं? ओडिशातील ट्रेन अपघातावेळी नेमकं काय घडलं?

कोलकाता : एकाच ट्रॅकवरुन धावणाऱ्या दोन रेल्वे गाड्यांची धडक होऊ नये यासाठी भारतीय रेल्वेनं कवच नवाची यंत्रणा जाहीर केली होती. या यंत्रणेची २०२२ पासून अंमलबजावणी देखील सुरु करण्यात आली. पण तरी देखील ओडिशाच्या बालासोर इथं तीन रेल्वे गाड्यांमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये २३८ जणांचा मृत्यू झाला आहे. पण रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कवच यंत्रणेचा मोठा गाजावाजा करत त्याचं सादरीकरण केलं होतं. पण काल ओडिशात झालेल्या रेल्वे अपघातावेळी ही यंत्रणा कुठे होती? असा सवाल आता विचारला जात आहे. (Odisha Train Accident Kavach couldnt have helped avert Balasore accident need to know)

भारतीय रेल्वेची काय आहे 'कवच' योजना?

'कवच' ही स्वदेशी ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) यंत्रणा आहे. ही यंत्रणा २०२२ मध्ये रेल्वे मंत्रालयानं तीन भारतीय विक्रेत्यांच्या सहकार्यानं संशोधन डिझाईन आणि मानक संघटनेद्वारे (RDSO) विकसित केली आहे.

कवच नेमकं कसं काम करतं?

जेव्हा लोको पायलट सिग्नल तोडतो जामुळेच बहुतेक वेळा ट्रेनमध्ये धडक होण्याची शक्यता असते. त्यामुळं एकाच ट्रॅकवर जर दुसरी रेल्वे येत असेल आणि या दोन्ही ट्रेन विशिष्ट अंतरावर असतील तर याचा अॅलर्ट कवच यंत्रणा लोको पायलटला देते. ब्रेकवर नियंत्रण मिळवत ट्रेन अॅटोमॅटिक थांबवते.

बालासोरच्या मार्गावर कवच नव्हतं - रेल्वे प्रवक्ते

दरम्यान, रेल्वेच्या प्रवक्त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की, कवच यंत्रणा ओडिशातील अपघातग्रस्त मार्गावर कार्यान्वित नव्हतं. यानंतर याचं स्पष्टीकरण देताना सांगितलं की, संपूर्ण भारतातील रेल्वेच्या जाळ्यामध्ये ही यंत्रणा इन्स्टॉल करायचं काम सुरु आहे.

वंदे भारतच्या इंजिनिअरनं सांगितलं कारण

दरम्यान, वंदे भारत ट्रेन्स तयार करण्यात ज्यांचं डोक लागलं आहे. ते रेल्वे इंजिनिअर सुधांशू मणी या अपघाताताबाबत सांगतात की, "कवच हा अपघात थांबवू शकलं नसतं. कारण प्रथमदर्शनी हे सिग्नल बिघाडाचे प्रकरण वाटत नाही. कारण पहिली ट्रेन रुळावरून घसरल्याचं कळतंय. त्यामुळं पहिली ट्रेन रुळावरून का घसरली याचा शोध सरकारने घ्यावा. कोरोमंडल एक्स्प्रेसच्या चालकाला ट्रेन वेगात धावत असल्यानं अडथळा दिसला तरी ब्रेक लावता आला नसता," असं मणी यांनी पुढे सांगितलं.

ममता बॅनर्जींचा 'कवच'वरुन सरकारला निशाणा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि माजी रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी या कवच यंत्रणेवरुन केंद्राला धारेवर धरलं आहे. मी स्वतः तीन वेळा रेल्वे मंत्री राहिली आहे. हा २१व्या शतकातील सर्वात मोठा अपघात आहे. अपघातांची अशी प्रकरणं रेल्वे सुरक्षा कमिशन आणि ते चौकशी करतात आणि याचा रिपोर्ट देतात. कोरोमंडल ट्रेनला जो अपघात झाला त्यामध्ये कुठलीही अँटि कोलिजन यंत्रणा नव्हती, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला.