Sharad Pawar : रेल्वे अपघातानंतर शरद पवारांनी सांगितली लालबहादुर शास्त्रींची आठवण; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

Sharad Pawar : रेल्वे अपघातानंतर शरद पवारांनी सांगितली लालबहादुर शास्त्रींची आठवण; म्हणाले...

Odisha Train Accident: ओडिशाच्या बालासोर इथं झालेल्या तीन ट्रेन्समधील भीषण अपघातात २३८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर अनेकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या घटनेनंतर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले की, रेल्वे अपघाताची चौकशी होणं गरजेचं आहे. त्यानंतर सत्य पुढे येईल. मात्र लालबहादुर शास्त्री रेल्वेमंत्री असतांना दुसरा रेल्वे अपघात झाला होता. नेहरु त्यांच्या राजीनाम्याच्या विरुद्ध होते. तरीही त्यानी नैतिक जबाबदारी म्हणत राजीनामा दिला होता. मात्र आज वेगळी परिस्थिती आहे. आजच्या राज्यकर्त्यांना जे योग्य वाटत असेल ते त्यांनी करावं.

अपघाताची दोन कारणे कोणती?

या अपघातामागे दोन कारणे असल्याचे रेल्वे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पहिली - मानवी चूक आणि दुसरी - तंत्रज्ञानातील चूक. या अपघातामागे तांत्रिक बिघाड हे मुख्य कारण असल्याचे अद्याप मानले जात आहे. अपघात झाला तेव्हा सिग्नलिंग यंत्रणा सक्रीय असती तर कोरोमंडल एक्स्प्रेस थांबवता आली असती. कारण, ड्रायव्हर कंट्रोल रूमच्या सूचनेनुसार ट्रेन चालवतो आणि ट्रॅकवरील ट्रॅफिक पाहून कंट्रोल रूमकडून सूचना दिल्या जातात. अशा स्थितीत अपघाताची माहितीही नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. मात्र, ही माहिती नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचण्यास लागणारा वेळ हा अपघात रोखण्यात मोठा घटक ठरू शकला असता.

शुक्रवारी रात्री झालेल्या रेल्वे अपघातात आत्तापर्यंत 238 लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. चेन्नईला जाणाऱ्या ट्रेनचे 10 ते 12 डबे या धडकेनंतर उलटले आहेत. तर दुसऱ्या गाडीचे 3 ते 4 डबे रुळावरून घसरले आहेत.

अपघातानंतर रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी

हावडा : 033 - 26382217

खडगपूर : 8972073925, 9332392339

बालासोर : 8249591559, 7978418322

शालीमार (कोलकाता) : 9903370746

रेलमदद : 044- 2535 4771

टॅग्स :Sharad PawarNCP