Odisha Train Accident: भारतीय रेल्वेने दिली महत्वाची माहिती! मृतांची संख्या वाढली, 56 लोक गंभीर जखमी

Odisha Train Accident
Odisha Train Accident

Odisha Train Accident: ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या तीन रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे, असे भारतीय रेल्वेने शनिवारी सांगितले.

आज दुपारी 2 वाजेपर्यंत ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे, तर 747 लोक जखमी झाले आहेत आणि 56 गंभीर जखमी आहेत, भारतीय रेल्वेनी ही माहिती दिली आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशातील बालासोर येथे रेल्वे अपघातस्थळी भेट देली. त्यांच्यासोबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान होते. (Odisha Train Accident Update)

Odisha Train Accident
Odisha Train Accident : दोषींवर कठोर कारवाई करणार, बालासोरमध्ये जखमींना भेटल्यानंतर मोदींचे आश्वासन

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्थानकावर बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस, कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी या तीन वेगवेगळ्या ट्रॅकवर तीन मार्गांनी अपघात झाला. ओडिशा सरकारच्या विशेष मदत आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन गाड्यांचे १७ डबे रुळावरून घसरले असून त्यांचे मोठे नुकसान झाले.

जखमींची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "ही वेदनादायक घटना आहे. जखमींच्या उपचारासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही. ही गंभीर घटना आहे, प्रत्येक कोनातून तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दोषी आढळले तर त्यांना कठोर शिक्षा होईल. रेल्वे ट्रॅक पूर्ववत करण्याच्या दिशेने काम करत आहे."

Odisha Train Accident
Supreme Court: बलात्कार पीडितेची कुंडली तपासण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com