Odisha Train Accident : दोषींवर कठोर कारवाई करणार, बालासोरमध्ये जखमींना भेटल्यानंतर मोदींचे आश्वासन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Odisha Train Accident

Odisha Train Accident : दोषींवर कठोर कारवाई करणार, बालासोरमध्ये जखमींना भेटल्यानंतर मोदींचे आश्वासन

Odisha Train Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशा रेल्वे अपघातातील जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २८० जणांचा मृत्यू झाला आहे.

यानंतर नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी बचाव कार्याचा आढावा घेतला आणि तेथे उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

नरेंद्र मोदी म्हणाले, ही एक वेदनादायक घटना आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही. ही गंभीर घटना आहे. (Narendra Modi At Odisha Train Crash Site To Meet Survivors In Hospital)

प्रत्येक कोनातून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दोषी आढळलेल्यांना कठोर शिक्षा केली जाईल. रेल्वे ट्रॅक पूर्ववत करण्यासाठी काम करत आहे, असे मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी स्थानिक नागरिकांनी केलेल्या मदतीचे देखील कौतुक केले आहे. यावेळी त्यांनी प्रशासनातील अधिकारी, डॉक्टर आणि ओडिशा सरकारचे आभार मानले.

टॅग्स :Narendra Modi