
Odisha News : '१२ तास मृतदेहाच्या ढिगाऱ्यात लेकाला शोधतोय पण..' अपघातात वाचलेल्या बापाची हृदयद्रावक कहाणी
Odisha News : ओडिसा येथील बालासोर येथे शुक्रवारी (२ जून) संध्याकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात २३३ जणांचा मृत्यू झाला असून ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या अपघातात शेकडोंच्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडले. अपघातात मुलगा गेला कळताच त्याचे वडील १२ तास त्यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधत होते. दु:खी बापची ती व्यथा शब्दात सांगण्यासारखी नव्हती. काळीज पिळवटून टाकणारी वाचलेल्या बापाची ती कहाणी.
बालासोर रेल्वे अपघाताजवळील एका शाळेत मृतदेहांचे ढीग पडले होते. या मृतदेहांमध्ये एक माणूस कोणाचा तरी शोध घेत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पांढऱ्या चादरीने झाकलेल्या प्रत्येक प्रेताचा चेहरा उघडल्यानंतर तो बंद कारायचा. काळीज पिळवटून टाकणारा तो क्षण होता. हा व्यक्ती दु:खाने ओरडत तिच्या मुलाच्या मृतदेहाचा शोध घेत होता.
काही प्रेतांचे चेहरे इतके खराब होते की त्यांना पाहून ते डोळे मिटून पुढच्या प्रेताकडे जायचे. रेल्वे अपघातानंतर हा व्यक्ती मध्यरात्री मृतदेहांच्या ढिगाऱ्यात मुलांचा शोध घेऊ लागला. तब्बल १२ तास काळजात दु:ख घेत वणवण फिरत या बापाने त्याच्या मृत पोराचा शोध घेतला. काही लोकांनी विचारलं तेव्हा कळलं की कोरोमंडल ट्रेन अपघातानंतर बेपत्ता झालेल्या आपल्या मुलाला हा व्यक्ती शोधत होता.
सदर व्यक्तीचे नाव होते वडील रवींद्र शॉ. 53 वर्षीय हा व्यक्ती त्यांचा मुलगा गोविंदा शॉसोबत प्रवास करत होते. कुटुंबाचे 15 लाखांचे कर्ज फेडण्यासाठी पिता-पुत्र दोघेही कमाईसाठी बाहेर पडले होते. त्यांचा मुलाचा मृतदेह अजूनही सापडलेला नसून ते अजूनही दु:खात आहेत.
15 लाखांचे कर्ज फेडण्यासाठी बाप-लेकं घराबाहेर पडले होते
रवींद्र शॉने जे सांगितले ते अनेकांना हादरवणारे होते. रवींद्र शॉ यांनी सांगितले की ते आणि त्यांचा मुलगा बसून त्यांच्या उज्वल भविष्यावर बोलत होते, त्यांचं कर्ज फेडण्यासाठी त्यांना किती कमवायचे आहेत आणि किती बचत करायची यावर ते दोघे चर्चा करत होते. तेवढ्यात अचानक बधिर करणारा आवाज आला आणि रेल्वे अपघात झाला. (Accident)
दु:खी बाप स्वत:ला सावरत मृतदेहांमध्ये त्याच्या मुलाचे अवशेष शोधू लागला
रवींद्र म्हणाले की, अपघातानंतर त्याला भानच राहिले नाही, काही मिनिटे अंधार पडला आणि मन सुन्न झाले. 'जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला होता. सर्वत्र मृतदेह आणि मृतदेहांचे तुकडे पडलेले होते. या मृतदेहांच्या तुकड्यांमध्ये त्यांनी आपल्या मुलाचा शोध सुरू केला. धडापासून वेगळ्या झालेल्या डोक्यापासून ते धड ते काळजीपूर्वक पाहत होते. (Odisha Accident)
कोणाचा तरी कापलेला हात किंवा पाय दिसायचा तेव्हा हा आपल्याच मुलाचा तर नाही ना हे ते काळजीपूर्वक बघत होते. मध्यरात्रीपर्यंत ते हताश होऊन लेकाचा शोध घेत होते. त्यानंतर ते मृतदेहाचा ढीग ठेवलेल्या ठिकाणी पोहोचले.'
प्रत्येक प्रेताचा चेहरा या व्यक्तीने जवळून पाहिला
रवींद्र बालासोरजवळच्या शाळेत पोहोचले जिथे डझनभर मृतदेह झाकलेले होते. तिथे जाऊन ते एकानंतर एक झाकलेले मृतदेह उघडून बघत होते. मात्र त्यांना त्यांचा मुलगा सापडला नाही. रवींद्र तिथेच बसून रडायला लागले. काही लोकांनी त्याचे सांत्वन करून त्याला पाणी प्यायला दिले. मात्र लेकाचा शोध त्यांनी थांबवला नाही. अधूनमधून ते झाकलेल्या मृतदेहांमध्ये त्यांच्या लेकाला शोधू लागले.