लघु पाटबंधारे अधिकाऱ्याच्या दुसऱ्या पत्नीच्या घरावर छापा; तब्बल 3.41 कोटींची रोकड जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Odisha Vigilance Department

लघु पाटबंधारे विभागाचे कार्तिकेश्वर राऊळ यांच्या दुसऱ्या पत्नीच्या अपार्टमेंटमधून ही रक्कम जप्त करण्यात आलीय.

अधिकाऱ्याच्या दुसऱ्या पत्नीच्या घरावर छापा; 3.41 कोटींची रोकड जप्त

भुवनेश्वर (ओडिशा) : ओडिशा दक्षता विभागानं (Odisha Vigilance Department) भुवनेश्वरमध्ये (Bhubaneswar, Odisha) दोन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये तब्बल 3.41 कोटी रुपयांची रोकड जप्त केलीय. जी राज्याच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम आहे, असं विभागाचे संचालक वाय. के. जेठवा (YK Jethwa) यांनी सांगितलंय.

लघु पाटबंधारे विभागाचे कार्तिकेश्वर राऊळ (Kartikeswar Roul) यांच्या दुसऱ्या पत्नीच्या अपार्टमेंटमधून (2.50 कोटी रुपये) आणि सलिया साहीमधील (Salia Sahi) त्यांच्या बहिणीच्या घरातून (1.41 कोटी रुपये) रोख रक्कम जप्त करण्यात आलीय.

हेही वाचा: आई आजारी असल्याचं सांगून 15 वर्षाच्या मुलीवर वीटभट्टीत बलात्कार

राऊळ यांची दुसरी पत्नी कल्पना प्रधान (Kalpana Pradhan) हिच्या चौकशीदरम्यान, तिनं बीबीएसआर येथील सलिया साहीमध्ये तिच्या बहिणीच्या घरात रोख रक्कम आणि सोनं इत्यादी लपवून ठेवल्याची कबुली दिलीय. आज पहाटे ओडिशा दक्षता विभागानं या ठिकाणाचा शोध घेतला असता, त्यांना ही मोठी रक्कम आढळून आली आणि त्यांनी ही रक्कम जप्त केलीय. दरम्यान, रोख रकमेसह अंदाजे 354 ग्रॅम सोनं आणि 78,50,000 रुपयांच्या रोख पेमेंटवर बीबीएसआर, पोखरीपुट इथं केसरी इस्टेट प्रायव्हेट लिमिटेडकडून (Kesari Estate Pvt Ltd at Pokhariput) ट्रिपलेक्स खरेदी केल्याची कागदपत्रही जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Odisha Vigilance Department Seizes Cash Worth Rs 3 41 Cr In Two Separate Raids

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Odisha