हिंसक निदर्शनांमुळे संतमहंतांचा रूद्रावतार...मुस्लिम समाजाची नाराजी!

रस्त्यावर उतरण्याची तयारी, भाजपमध्येही सुप्त अस्वस्थता
offensive statement against muslim community nupur sharma and naveen jindal suspended from bjp pm narendra modi politics
offensive statement against muslim community nupur sharma and naveen jindal suspended from bjp pm narendra modi politics sakal

नवी दिल्ली - भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा व पक्षातून हकालपट्टी केलेले नवीन जिंदाल यांच्या प्रेषितांबाबतच्या अपमानास्पद उद्गारांनंतर तब्बल १५ दिवस उलटल्यावर कालच्या (शुक्रवारी) जुम्मा नमाजानंतर देशाच्या अनेक भागांत जो हिंसाचार उसळला त्यामुळे संतमहंत संतप्त झाले आहेत. मुस्लिम समाजाच्या भावना भडकावून अराजक माजविणाऱयांविरूध्द कठोर कारवाई करावी या मागणीसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे कालच्या हिंसाचारानंतर नुपूर शर्मांवर केलेल्या कारवाईबद्दल भाजपमध्ये दिसणारी सुप्त पण वाढती नाराजी वाढल्याचे दिसत आहे.

काशी धर्म परिषदेची तातडीची बैठक काल झाली व तीत मुस्लिम आंदोलनकर्त्यांच्या हिंसाचारावर तीव्र निंदाजनक ठराव मंजूर करण्यात आला. नुपूर यांच्यावर कारवाई का झाली ? असा अनेक हिंदुत्त्ववादी विचारवांतांचाही सवाल आहे. प्रेषित पैगंबर यांच्याबद्दल बंदी घाललेला धर्मप्रसारक झाकीर नाईक यानेही यापूर्वी आपल्या प्रवचनांत यासारख्या अनेक गोष्टी जाहीरपणे सांगितल्याचा दाखला दिला जातो. काशी पाठोपाठ दिल्ली व प्रायागराज, हरिद्वार, नाशिक-त्र्यंबकेश्वरसह सिंहस्थ कुंभमेळा भरणाऱया शहरांमध्येही साधूमहंतांच्या बैठका घेण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती मिळते. विश्व हिंदू परिषदेसह संघपरिवारातही या कारवाईबद्दल नाराजी दिसते. भाजपच्या अनेक नेत्यांनी, ‘वुई सपोर्ट नुपूर शर्मा‘ असे ट्विट कॅंपेन चालविले होते त्यांना कडक तंबी देण्यात आल्यावर त्यातील अनेकांनी आपापली ट्विट डिलीट केली आहेत. मात्र यासारखी मोहीम पुन्हा चालणारच नाही हे सांगता येत नसल्याचे एका ज्येष्ट पक्षनेत्याचे म्हणणे आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या नुपूर शर्मा यांच्या समर्थनासाठी पुढे आल्या व आगामी काळात अनेक संतमहंत लोकप्रतीनिधी त्यांच्या मार्गाने जाण्याची शक्यता वर्तविली जाते.

दरम्यान जुम्म्याच्या नमाजानंतर जो हिंसाचार झाला त्याच्या विरूध्द त्रित कारवाई केली नाही, त्यांची संपत्ती जप्त केली नाही तर साधूमहंत या अराजक तत्वांविरूध्द रस्त्यावर उतरतील असा जाहीर इशारा देण्यात आला. काशीच्या पाताळपुरी मठाचे पीठाधीश्वर महंत बालकदास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठक में काशी के मठों के पीठाधीश्वर, संत, महंत सहभागी झाले त्यात १६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. शर्मा यांच्यावर भाजपनेच केलेल्या करवाईमुळे मुस्लिम समाजातील हिंसक प्रवृत्तींची हिंमत वाढल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. हिंदू देवीदेवतांचा जाहीर अपमान करणाऱया, चित्रपटातून देवतांची थट्टा करणाऱयांना सरकारने तत्काळ तुरूंगात पाठवावे, रांचीतील हनुमान मंदिराच्या तोडफोडीला जबाबदार असलेल्यांविरूध्द केंद्रानेच करवाई करावी अशाही मागण्या संतांच्या बैठकीत करण्यात आल्या. काशी धर्म परिषद नुपूर शर्मा हिच्या पाठीशी ठामपणे उभी असून तिला धमक्या देणाऱयांना मोदी सरकारने त्याच वेगाने ‘रासूका‘ खआली जेरबंद करावे ज्या पध्दतीने तिच्यावर निलंबनाची कारवाई भाजपने केली अशी भावना व्यक्त करण्यात आली. दिल्लीतील संत उदासीन जुना आखाडा येथील साधूमहंतांनीही कालच्या हिंसाचाराबद्दलचा रोष व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com