LPG Cylinder Price: एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात, पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LPG Cylinder Price

LPG Cylinder Price: एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात, पण...

एलपीजी सिलेंडरच्या किमतीत आज १ मे २०२३ रोजी म्हणजेच कामगार दिनी सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली. (Oil marketing companies have revised the prices of commercial LPG gas cylinders)

सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 171.50 रुपयांची कपात केली आहे. मात्र घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींमध्ये सध्या कोणताही बदल झालेला नाही.

अनेक शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती बदलल्या आहेत. नव्या दरानुसार आता व्यावसायिक सिलेंडरची किंमत मुंबईत 1808.50 रुपये असणार आहे. दिल्लीत 1856.50 रुपये, कोलकातामध्ये 1960.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 2021.50 रुपये आहे. तेल कंपन्यांनी त्यांच्या वेबसाइटवर नवीन दर अपडेट केले आहेत.

दर महिन्याच्या 1 तारखेला सरकारी तेल कंपन्या गॅसच्या किमतीत बदल करतात. १ एप्रिल २०२३ रोजी देखील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही कपात करण्यात आली होती. त्यानंतर गॅस सिलेंडर सुमारे 92 रुपयांनी स्वस्त झाला होता. तर मार्चमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 350 रुपयांहून अधिक वाढ झाली होती.