तेलगळतीमुळे 34 चौरस किमी समुद्राचे प्रदूषण

पीटीआय
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

चेन्नई- शनिवारी चेन्नई जवळील इन्नोर बंदराजवळ दोन मालवाहू जहाजांच्या धडकेने झालेल्या तेलगळतीमुळे समुद्राच्या 34 चौरस किलोमीटर भागाचे प्रदूषण झाले असल्याची माहीती पूर्व तटरक्षक दलाचे महानिरिक्षक राजन बरगोत्रा यांनी दिली. 

राजन म्हणाले, तेलगळती झाल्यानंतर नेमका अंदाज लावणे कठीण असल्याने तेलगळतीचा आकडा सांगणे कठीण आहे. आमच्या अंदाजानुसार जवळपास 20 टन तेलाची गळती झाली आहे. समुद्र किनाऱ्यावर आम्ही कोणत्याही रसायनांचा वापर करू देत नाही ज्या कंपनीच्या जहाजांमुळे हा अपघात झाला आहे त्यांची ही जबाबदारी आहे.

दरम्यान चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्याजवळ पाच वेगवेगळ्या ठिकाणी तेलाचे तवंग आढळून आले. ते बाजूला करण्यासाठी काही विशेष यंत्रणा नसल्याने जास्त कालावधी लागणार आहे. या साफसफाईसाठी विविध संस्था दिवसरात्र मेहनत करत आहेत. यामध्ये तिरुवल्लूर जिल्हा प्रशासन, तमिळनाडू प्रदुषण नियंत्रण मंडळ, तटरक्षक दल, महाविद्यालयीन विद्यार्थी व चेन्नई महानगरपालिकेचे अधिकारी यांचा समावेश आहे. यासाठी शेकडो स्वयंसेवकांनी आणि प्रशासनातील विविध विभागातील अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. या तेलगळतीबाबत राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल केलेल्या तक्रारीची सुनावणी 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 
 
Web Title: oil spill pollutes 34000 square meter sea area