ओला कॅबमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

कॅबचालक आणि त्याच्यासोबत कॅबमध्ये बसलेल्या इतरांनी पीडित महिलेला दारू पाजण्याचा प्रयत्न केला. पण तिने विरोध केल्यानंतर कॅबचालकाने एका जंगलात गाडी थांबवली आणि त्याठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. 

नवी दिल्ली : ओला कॅबमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना ग्रेटर नोएडा येथे घडली. नोएडा येथे एका कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेने ओला कॅबचालकासह त्याच्या साथीदारांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. 

Rape

पीडित महिलेने सुरजपूर येथे जाण्यासाठी सेक्टर 37 येथून ओला कॅब बुक केली होती. या कॅबमध्ये महिला बसली. त्यानंतर काही वेळानंतर कॅबचालकाचे मित्रही कॅबमध्ये बसले आणि त्यांनी महिलेवर जबरदस्ती करत तिला दारू पाजण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित महिलेने याबाबत विरोध केल्यानंतर कॅब चालकाने गाडीत बसलेल्या मित्रांसह महिलेवर सामूहिक बलात्कार केला. याबाबतची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी कॅबचालकाच्या भावासह 6 जणांना ताब्यात घेतले. 

कॅबचालक आणि त्याच्यासोबत कॅबमध्ये बसलेल्या इतरांनी पीडित महिलेला दारू पाजण्याचा प्रयत्न केला. पण तिने विरोध केल्यानंतर कॅबचालकाने एका जंगलात गाडी थांबवली आणि त्याठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. 

Web Title: OLA cab Driver and Others gang Raped on Women in Noida