भयानक! वृद्ध महिलेवर बलात्कार, शरीरावर केले २५ वार

३० वर्षाच्या आरोपीचे अत्यंत क्रूर कृत्य
rape
rape

नवी दिल्ली: दिल्लीमध्ये एक भयानक गुन्हा (crime) घडला आहे. एका वृद्ध महिलेवर बलात्कार (rape) करण्यात आला. नंतर तिची गळा चिरुन हत्या करण्यात आली. पूर्व दिल्लीतील न्यू अशोक नगर भागात रविवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. मृत महिलेचा भाजी विक्रीचा व्यवसाय होता. आरोपी तिशीतील असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी सुद्धा महिला राहते, त्याच वस्तीत राहतो. आरोपीने बलात्कारानंतर महिलेची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या (Murder) केली. आरोपीने पीडित महिलेची भोसकून हत्या केली. तीक्ष्ण हत्याराने तिच्यावर २५ वार केले. (Old Woman Raped Stabbed 25 Times by Man Half Her Age in Delhi)

मृत महिलेचा लहान मुलगा घरी आला, त्यावेळी गुन्हा उघडकीस आला. तो बँकेत सुरक्षा रक्षकाचे काम करतो. घराचा दरवाजा उघडला, त्यावेळी आई त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्याने लगेच आईला धर्मशीला रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. रुग्णालयाने पोलिसांना या गुन्ह्याची माहिती दिली. पोलिसांनी रुग्णालयात येऊन मुलाची जबानी नोंदवली. घराजवळच आई भाजी विक्रीचा व्यवसाय करत असल्याची त्याने माहिती दिली. रविवारी दुपारी आई घरी जेवण बनवण्यासाठी गेली होती, त्यावेळी अज्ज्ञात आरोपीने तिच्यावर हल्ला केला असे त्याने पोलिसांना सांगितले.

rape
ऑनलाइन वर्ग सुरु असताना शिक्षिकेकडेपाहून मुलाची अश्लील कृती

वैद्यकीय तपासणीतून महिलेवर लैंगिक जबरदस्ती झाल्याचे समोर आले आहे. पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळावर फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीमही आली होती. प्राथमिक तपास सुरु केल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी संशयित आरोपी महिलेच्या घरामध्ये प्रवेश करताना दिसतो. त्यानंतर २० मिनिटात तो तिथून निघाला.

rape
एरोली: निवृत्त पोलिसाच्या गोळीबारात एका मुलाचा मृत्यू

"या २० मिनिटातच महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. स्थानिक गुप्तचरांच्या मदतीने आम्ही आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली" असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. वीपीन देढा असे आरोपीचे नाव आहे. तो सुद्धा त्याचा वस्तीत राहतो असे पोलीस उपायुक्त प्रियांका कश्यप यांनी सांगितले. आरोपीने महिलेची हत्या केल्याचा आरोप मान्य केला. गुन्ह्यासाठी वापरलेले हत्यारही त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com