'नरेंद्र मोदी व दोवल यांच्यामुळेच ओम पुरींचे निधन'

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जानेवारी 2017

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत दोवल यांच्यामुळेच ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे निधन झाले आहे, असे पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनेचे निवेदक अमीर लियाकत यांनी म्हटले आहे.

'सप्टेंबर 2016 मध्ये उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 19 जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्यानंतर ओम पुरी यांनी जवानांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. ओम पुरी यांच्या वक्तव्यानंतर मोदी व दोवल यांच्याकडून पुरींवर दबाव आला होता. दबावानंतर ओम पुरींनी मद्यप्राशनात वाढ केली होती. यामुळे ओम पुरी यांच्या मृत्यूला मोदी व दोवल जबाबदार आहेत. ओम पुरी यांच्यानंतर फवाद खान व सलमान खान हे मोदींच्या हिटलिस्टवर आहेत,' असे लियाकत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ओम पुरी यांचे 6 जानेवारी रोजी राहत्या संशयास्पद मृत्यू झाला आहे, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यांच्या डोक्याला जखम आढळून आल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून, पुढील तपास करत आहेत.

Web Title: Om Puri died because of Narendra Modi, Ajit Doval': Pak TV anchor