भाजपने दहशतवाद वाढवला : ओमर अब्दुल्ला

वृत्तसंस्था
शनिवार, 23 जून 2018

भाजप सरकारने राज्यात दहशतवाद आणि हिंसा वाढवली. त्यामुळे दहशतवाद्यांना मारण्यासाठी सुरक्षा दलांना अधिक प्रवृत्त व्हावे लागले, असे नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले. 

श्रीनगर : भाजप सरकारने राज्यात दहशतवाद आणि हिंसा वाढवली. त्यामुळे दहशतवाद्यांना मारण्यासाठी सुरक्षा दलांना अधिक प्रवृत्त व्हावे लागले, असे नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले. 

ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले, की हे आकडे जारी करताना केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांना लाज वाटली पाहिजे. वास्तविक मंत्री महोदय, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, की ज्याप्रकारे राज्यात दहशतवाद आणि हिंसा वाढण्यास मदत केली. त्यामुळेच सुरक्षा दलांना दहशतवाद्यांना मारण्यासाठी अधिक प्रवृत्ता व्हावे लागले. त्यामुळे हे आकडे पाहून आपल्याला लाज वाटली पाहिजे.

दरम्यान, यापूर्वी रविशंकर प्रसाद यांनी सांगितले, की जम्मू-काश्मीरमध्ये 2012 मध्ये 72, 2013 मध्ये 67, 2014 मध्ये 110, 2015 मध्ये 108, 2016 मध्ये 150, 2017 मध्ये 217 तर 2018 मध्ये आत्तापर्यंत 75 दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाच्या कारवाईत खातमा करण्यात आला. 

Web Title: omar abdullah attacks bjp on terrorism in jammu kashmir