उमर अब्दुल्ला यांच्यासाठी बहीण न्यायालयात

वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या सार्वजनिक सुरक्षा कायद्यान्वये (पीएसए) स्थानबद्धतेच्या निर्णयाविरोधात अब्दुल्ला यांची बहीण सारा अब्दुल्ला पायलटने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या सार्वजनिक सुरक्षा कायद्यान्वये (पीएसए) स्थानबद्धतेच्या निर्णयाविरोधात अब्दुल्ला यांची बहीण सारा अब्दुल्ला पायलटने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलम काढल्यानंतर उमर अब्दुल्लांना पीएसएअंतर्गत सहा महिन्यांसाठी नजरकैदेत ठेवण्यात आले होते. याची मुदत पाच फेब्र्रुवारीला संपली होती. मात्र, यानंतर पुन्हा त्यांच्यावर पीएसएअंतर्गत कारवाई करत नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यावर सारा अब्दुल्ला पायलट यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वरिष्ठ वकील कपिल सिब्बल हे अब्दुल्ला यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करणार आहेत. तसेच, चालू आठवड्यात सुनावणीची तारीख देण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली आहे. पीएसएअंतर्गत नव्याने स्थानबद्ध करण्याचा आदेश घटनाबाह्य आणि मूलभूत हक्काचे उल्लंघन असल्याचे सारा अब्दुल्ला पायलट यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. तसेच, पाच फेब्रुवारीला पीएसएअंतर्गत अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यासाठी काढण्यात आलेल्या आदेशाला रद्द करण्याची मागणीही या याचिकेत केली आहे.

कुमारस्वामींचा मुलगा अन् काँग्रेस नेत्याची भाची अडकणार लग्नाच्या बेडीत

दरम्यान, नागरिकांवर असलेला लक्षणीय प्रभाव हे कारण माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना पीएसएअंतर्गत स्थानबद्ध करण्याच्या समर्थनार्थ देण्यात आले आहे. तसेच, उमर यांनी अनुच्छेद ३७० व ३५ ए रद्द करण्याच्या विरोधात सामान्य लोकांना भडकावण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Omar Abdullahs sister challenges his detention under PSA in Supreme Court