नगरोटा लष्करी तळाजवळ घुसखोरास अटक

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

जम्मू : नगरोटा लष्करी तळामध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीस जखमी करून पकडल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्‍त्यांनी दिली. काल रात्री एक अज्ञात व्यक्ती संशयितपणे नगरोटा तळाजवळ तसेच तावी नदीच्या किनारी फिरताना आढळल्यानंतर आज सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

प्रवक्‍त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहारेकऱ्यांनी या व्यक्तीला इशारा दिला होता; परंतु त्याला या व्यक्तीने दाद न देता तळाच्या कुंपणाला ओलांडत आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पहारेकऱ्यांनी गोळीबार करत त्याला जखमी केले. यानंतर शीघ्र कृती दलाच्या जवानांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून त्याला जवळच्या लष्करी रुग्णालयात दाखल केले.

या घटनेबद्दल पोलिसांना कळविण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीची चौकशी सुरू असून, त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, सुमारे दीड महिन्यापूर्वी नगरोटा भागातच लष्करावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन अधिकारी आणि पाच जवान हुतात्मा झाले होते.

Web Title: one arrested in nagrota military camp