मोदींना दोष देणाऱ्यास मारहाण

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर एटीएमसमोर लागणाऱ्या रांगांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोष देणाऱ्या एका व्यक्तीस मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. लल्लन कुशवाह असे त्यांचे नाव असून ते इस्माईपूर भागातून निघाले होते.

तेथील एटीएमसमोर लागलेली रांग पाहता त्यांनी ''हे सर्व मोदींमुळे' अशी टिप्पणी केली. ही टिप्पणी रांगेत उभा असलेल्या आतिक नावाच्या एका व्यक्तीने ऐकली. त्याने रांगेतून बाहेर पडत कुशवाह यांना जाब विचारत स्टंपने मारहाण केली. यात कुशवाह यांच्या डोक्‍याला दुखापत झाली असून, याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: one beaten for blaming modi for note ban