बेरोजगारीविरोधात पणजीत एकदिवशीय उपोषण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

राज्यातील खाण व्यवसाय बंद झाल्याने तसेच शिक्षण घेऊनही रोजगार मिळणे युवकांना मुश्कीलीचे बनले आहे.

गोवा - भारतीय राष्ट्रीय युवा संघटनेतर्फे (एनएसयूआय) बेरोजगार युवकांसाठी संघटित या बॅनरखाली आज पणजीतील आझाद मैदानावर एक दिवसाचे उपोषण सुरू केले आहे. राज्यातील खाण व्यवसाय बंद झाल्याने तसेच शिक्षण घेऊनही रोजगार मिळणे युवकांना मुश्कीलीचे बनले आहे.

खासगी कंपन्यांही राज्याबाहेरील उमेदवारांना नोकरीत घेत आहेत. अभियांत्रिकी शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नाहीत. अशा परिस्थितीत गोव्यातील बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असूनही सरकार त्यावर कोणताच तोडगा काढत नाही.

येत्या पंधरा दिवसात कामगारमंत्र्यांनी गोमंतकियांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उपाय न काढल्यास बेमुदत उपोषण केले जाणार असल्याचा इशारा एनएसयूआयचे नेते अहराज मुल्ला यांनी दिला आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: One Day Fasting Against Unemployment In Panji Goa