बाणस्तारी येथे टेंपो उलटून एक ठार, नऊ जखमी 

accident
accident

गोवा - बाणस्तारी येथे टेंपो चालकाचा वाहनावरील नियंत्रण गेल्याने टेंपो उलटून रस्त्याच्या बाजूला पडला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर नऊजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आलेे आहे. 

फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेंपो बाणस्तारीहून माशेलच्या दिशेने जात होता. भरधाव वेगात असलेल्या टेंपो चालकाचा वळवणार नियंत्रण जाऊन कडेला असलेल्या शेतजमिनीत उलटला.

यावेळी टेंपोत मागे सात मजूर बसले होते तर चालकासह पुढे आणखी दोन मजूर बसले होते. जखमींवर उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com