गोव्यातील तुरुंग फोडण्याचा प्रयत्न फसला; 1 ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जानेवारी 2017

वास्कोमधील सडा तुरुंगातील 49 कैद्यांनी एकत्रितपणे कट रचून येथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तुरुंग प्रशासनाच्या सावधगिरीमुळे कैद्यांचा हा प्रयत्न फसला.

पणजी : गोव्यातील वास्को येथील तरुंग फोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेले 49 कैद्यांचा डाव तुरुंग प्रशासनाने शिताफीने उधळून लावला. यावेळी झालेल्या संघर्षात एका सराईत गुंड मारला गेला, तर दोन अधिकाऱ्यांसह एकूण 12 जण जखमी झाले. 

वास्कोमधील सडा तुरुंगातील 49 कैद्यांनी एकत्रितपणे कट रचून येथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तुरुंग प्रशासनाच्या सावधगिरीमुळे कैद्यांचा हा प्रयत्न फसला. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी त्वरीत कारवाई केली. यावेळी 6 कैदी जखमी झाले, तर एकाचा मृत्यू झाला.

तुरुंग फोडण्याच्या या घटनेनंतर सडा तुरुंगाचा पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. येथे सुमारे दोनशे पोलिसांनी गस्त घातली. जखमींना बांबोळीमधील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
 

Web Title: one dead as inmates try to break sada jail in goa

टॅग्स