शाहरुखच्या एका झलकेसाठी फॅनने गमावला जीव

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जानेवारी 2017

वडोदरा- बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचे येथील रेल्वे स्टेशनवर आगमन होताच त्याला पाहण्यासाठी उसळलेल्या गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. 

शाहरुख खान ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसने सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वडोदरा रेल्वेस्टेशनच्या फलाट क्रमांक सहावर आली. तिथे ती दहा मिनिटे थांबली तेव्हा शाहरुख उतरला. आगामी चित्रपट 'रईस'च्या प्रसिद्धीसाठी तो येथे आला होता. 

फरीद खान पठाण असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून, ते वडोदरामधील हातीखाना येथील रहिवासी आहेत. पठाण त्यांच्या पत्नी व मुलीसोबत शाहरुखला पाहण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले होते. 
या गोंधळामध्ये रेल्वे पोलिसांचे दोन कर्मचारी खाली पडून जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 
 
Web Title: One Dead as Shah Rukh Khan Fans Mob Vadodara Station