दिल्ली: पानवाल्याशी वादातून गोळीबार; एक ठार

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील गंगापूरी परिसरात एका पानविक्रेत्याशी झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाने केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील गंगापूरी परिसरात एका पानविक्रेत्याशी झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाने केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे.

शनिवारी रात्री साडे दहा वाजता तीन तरुण गंगापूरी परिसरातील एका पानाच्या दुकानात आले. त्यांनी पानविक्रेत्याशी वाद घातला. तिघांपैकी एकाने त्याच्याजवळ असलेल्या पिस्तुलमधून गोळीबार केला. एक गोळी पानविक्रेत्याच्या सहकाऱ्याला लागली. त्यामुळे पानविक्रेत्याने दुकानातील वीजेचे दिवे बंद केले. या प्रकारानंतर एका तरुणाला पकडण्यात आले. तर इतर दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले. दिल्ली पोलिसांनी परिसर वाहतुकीसाठी बंद केला असून तपास सुरू केला आहे.

Web Title: One killed in Delhis Gangapuri

टॅग्स