बद्रिनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; एकाचा मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 10 जून 2017

दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर हे ऑगस्टा कंपनीचे असून, मुंबईतील इकाई क्रिस्टर एव्हिएशन या सेवा पुरविणाऱ्या कंपनीचे होते. आज सकाळी आठच्या सुमारास उड्डाण घेत असतानाच ते कोसळले. बद्रिनाथहून हरिद्वार येथे हेलिकॉप्टर जात होते. 

डेहराडून - उत्तराखंडमधील बद्रिनाथ येथे आज (शनिवार) सकाळी प्रवाशांना घेऊन जाणारे खासगी हेलिकॉप्टर उड्डाण घेताच कोसळले. या दुर्घटनेत इंजीनियरचा मृत्यू झाला आहे, तर दोन्ही वैमानिक जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बद्रिनाथ येथून भाविकांना घेऊन जाणारे खासगी हेलिकॉप्टर उड्डाण घेत असतानाचा कोसळले. हेलिकॉप्टरच्या ब्लेडमध्ये अडकून इंजीनियरचा मृत्यू झाला आहे. तर दोन्ही वैमानिक जखमी आहेत. पाच प्रवासी सुखरूप आहेत. या दुर्घटनेत इंजीनियर विक्रम लांबा यांचा मृत्यू झाला आहे.

दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर हे ऑगस्टा कंपनीचे असून, मुंबईतील इकाई क्रिस्टर एव्हिएशन या सेवा पुरविणाऱ्या कंपनीचे होते. आज सकाळी आठच्या सुमारास उड्डाण घेत असतानाच ते कोसळले. बद्रिनाथहून हरिद्वार येथे हेलिकॉप्टर जात होते. 

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
लष्कराने घुसखोरीचा कट उधळला; 5 दहशतवादी ठार
महात्मा गांधी 'चतुर बनिया' होते: अमित शहा
धुळे: कर्जमाफीच्या वाऱ्यामुळे शेतकरी सभासदांनी थकविले 134 कोटी
बाईला बाई होण्यासाठी कर भरावा लागणार?
#स्पर्धापरीक्षा -'ईएनव्हीआयएस' पर्यावरण पोर्टल​
ब्रिटनमध्ये त्रिशंकू स्थिती​

'सिद्धेश्‍वर'ची चिमणी पाडण्यास कोणी नाही तयार
जिगरबाज बांगलादेशचा न्यूझीलंडवर विजय

Web Title: One killed as helicopter crashes in Badrinath