राजकीय हिंसाचारात कुचबिहारमध्ये एक मृत्युमुखी

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जून 2018

पश्‍चिम बंगालच्या कुचबिहारमध्ये राजकीय पक्षांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला, तर अन्य काही जण जखमी झाले, असे पोलिसांनी आज सांगितले.
 

कुचबिहार (पश्‍चिम बंगाल) - पश्‍चिम बंगालच्या कुचबिहारमध्ये राजकीय पक्षांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला, तर अन्य काही जण जखमी झाले, असे पोलिसांनी आज सांगितले.

कुचबिहार जिल्ह्यातील जामलदाहा भागात काल रात्री दोन राजकीय पक्षांच्या समर्थकांमध्ये ही हाणामारी झाली. त्यात रमजानमियॉं हे ठार झाले त्याचप्रमाणे अनेक जण जखमी झाले, असे ते म्हणाले. या घटनेत नक्की किती जण जखमी झाले, याचा आकडा पोलिसांनी सांगितला नाही. या भागात शांतता राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले. या घटनेत मरण पावलेला रमजानमियॉं आणि त्याचप्रमाणे यात जखमी झालेला अताबुल इस्लाम हा नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत निवडून आला होते, असा दावा मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. 
 

Web Title: One killed in Kuchbihar in political violence