श्रीलंका नौदलाच्या गोळीबारात भारतीय मच्छिमाराचा मृत्यू

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मार्च 2017

श्रीलंकेच्या नौदलाने गेल्या आठवड्यात 15 भारतीय मच्छिमारांना अटक केली होती. त्यांच्याकडील बोटी व साहित्य जप्त करण्यात आले होते.

रामेश्वरम - धनुषकोडी आणि कच्छाथेवू या तमिळनाडूतील किनाऱ्यादरम्यान मच्छिमारी करणाऱ्या भारतीय मच्छिमारांवर श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या गोळीबारात एका मच्छिमाराचा मृत्यू झाला असून, तिघेजण जखमी आहेत.

या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारानंतर रामेश्वरम येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 22 वर्षीय मच्छिमाराचा मृत्यू झाला. भारतीय हद्दीत मच्छिमारी करत असतानाही श्रीलंकेच्या नौदलाने गोळीबार केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

श्रीलंकेच्या नौदलाने गेल्या आठवड्यात 15 भारतीय मच्छिमारांना अटक केली होती. त्यांच्याकडील बोटी व साहित्य जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिल्यानंतर ही गोळीबाराची घटना घडली आहे. 

Web Title: One killed as Sri Lankan Navy opens fire on Indian fishermen