योगी आदित्यनाथांनी टॉपरला दिलेला चेक बाऊन्स

वृत्तसंस्था
रविवार, 10 जून 2018

अालोक मिश्रा असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. अालोक मिश्राला उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्ड परीक्षेत 93.5 टक्के गुण मिळून तो सातवा आला. त्यामुळे 29 मेला लखनौ येथे त्याचा सत्कार करण्यात आला होता.

बराबंकी : उत्तर प्रदेश बोर्ड परीक्षेतील टॉपरला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून एक लाखाचा धनादेश (चेक) देण्यात आला. मात्र, ज्यावेळी त्याला योगी आदित्यनाथ यांनी दिलेला चेक बाऊन्स झाल्याचे समजल्यानंतर तो निराश झाला. त्याचा चेक बाऊन्स झाल्याने दंडापोटी द्यावी लागणाऱ्या रकमेचा भुर्दंडही त्याला भरावा लागला. 

अालोक मिश्रा असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. अालोक मिश्राला उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्ड परीक्षेत 93.5 टक्के गुण मिळून तो सातवा आला. त्यामुळे 29 मेला लखनौ येथे त्याचा सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी अालोकला योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते एक लाख रूपयांचा चेक देण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी दिलेला हा चेक अालोकचे वडील 5 जूनला बँकेत जमा करण्यासाठी गेले होते. मात्र, चेकवरील सही आणि खात्यावरील सही जुळत नसल्याचे कारण देत बँकेने तो चेक वटवला नाही. चेक बाऊन्स झाल्याने बँकेच्या नियमाप्रमाणे त्यांना दंडापोटी काही रक्कमही बँकेत जमा करावी लागली.  

याबाबत आलोकने सांगितले, की मला जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक लाखाचा चेक मिळाला तेव्हा मी अत्यंत आनंदित झालो होतो. मात्र, जेव्हा हा चेक बाऊन्स झाल्याचे समजल्यानंतर मी निराश झालो. 

Web Title: One lakh check bounces given by Chief Minister