J&K : सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; नागरिकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Terrorist Attack

J&K : सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; नागरिकाचा मृत्यू

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार (Terrorist and Forces Cross Fire) केला. यावेळी जवानांनी देखील दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ही चकमक काही वेळ चालली. पण, यामध्ये एका स्थानिक नागरिकाचा गोळी लागून मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: जम्मू काश्मीर : यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला आग, 4 जणांचा मृत्यू

शोपियानमधील पुलवामा आणि तुर्कवांगमला जोडणाऱ्या पुलाजवळ सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एसओजीच्या संयुक्त गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यालाच जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात शोएब गनी नावाचा एक नागरिक जखमी झाला, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याला उपचारासाठी पुलवामा येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याचा मृत्यू झाला. दहशतवादी जवळच्या बागांमध्ये घुसण्यात यशस्वी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या दहशतवाद्यांची शोध मोहिम सुरू आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घुसखोरी करून घातपात करत असतात. यावेळी त्यांना उत्तर देताना झालेल्या चकमकीत नागरिकांचा देखील मृत्यू होता. आतापर्यंत अशा अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे जम्मूतील स्थानिकांमध्ये रोष पाहायला मिळतो. काही दिवसांपूर्वी दहशतवादी घुसखोरी करत असलेल्या एक सुरूंगचा लष्कराने भंडाफोड केला होता. त्यामुळे लष्कराच्या जवानांनी मोठा घातपाताचा कट उधळून लावला होता. तसेच चार दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी राहुल पंडीत या कश्मिरी पंडितांची तहसील कार्यालायत गोळी झाडून हत्या केली. त्यामुळे काश्मीर धुमसत असून नोकरीवर असलेल्या काश्मिरी पंडितांनी राजीनामे देखील दिले आहेत. आम्हाला याठिकाणी सुरक्षित वाटत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच राहुल पंडीत यांच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात निदर्शने देखील सुरू आहेत.

Web Title: One Local Civilian Killed In Forces And Terrorist Crossfire

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :terrorist attack
go to top