जम्मू-काश्मीर : मेंढर सेक्टर येथे आयईडी स्फोट; एक जवान हुतात्मा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

मेंढर परिसरात पुंछ सेक्टर मध्ये एलओसीजवळ हा स्फोट झाला आहे. या स्फोटात एक जवान हुतात्मा झाले आहे, तर 7 जवान जखमी झाले आहेत. 

जम्मू-काश्मीरच्या मेंढर सेक्टर येथे आयईडी स्फोट झाल्याची बातमी येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेंढर परिसरात पुंछ सेक्टर मध्ये एलओसीजवळ हा स्फोट झाला आहे. या स्फोटात एक जवान हुतात्मा झाले आहे, तर 7 जवान जखमी झाले आहेत. 

येथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मेंढर परिसरात नियंत्रण रेषेजवळ एक आयईडी स्फोट झाल्याने सेनेच्या एका जवानाला आपले प्राण गमवावे लागले तर अन्य सात जण जखमी झालेत. ज्यावेळी हे स्फोट झालेत त्यावेळी 12 मद्रास रेजिमेंटचा एक पहारा देणारा एक जवानांचा दल डेरा डबसी क्षेत्र पार करत होता. जखमी जवानांना नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One military personnel has lost his life and seven are injured in IED Blast at mendhar area of jammu kashmir

टॅग्स