काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मार्च 2017

येथे गोळीबाराचे आवाज ऐकू आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा गावात एका दहशतवाद्याला भारतीय सैन्याने काल (बुधवार) रात्री कंठस्नान घातले. 

पुलवामा जिल्ह्यात पडगमपुरा भागात सैन्याने वेढा दिला असून, येथे शोधमोहीम सुरू केली आहे. या परिसरात आणखी दोन ते तीन दहशतवादी लपून बसले असावेत असा लष्कराला संशय आहे. येथे गोळीबाराचे आवाज ऐकू आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दहशतवादी या भागात लपले असल्याची खबर मिळाल्यानंतर लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष कारवाई गटाने (SOG) येथे धडक कारवाई हाती घेतली आहे. 
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "मोठ्या प्रमाणावर शस्त्रांनी सज्ज असलेल्या दोन दहशतवाद्यांना एका घरात अडकवून ठेवण्यात आले आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 130 बटालियनचे, 55 राष्ट्रीय रायफल्स आणि SOG पुलवामा हे संयुक्तपणे येथे कारवाई करीत आहेत."
 

Web Title: one terrorist killed in pulwama in south kashmir