सांगा बरं, सर्वात जास्त अफेअर्स कुठे चालतात...

वृत्तसंस्था
सोमवार, 22 जुलै 2019

प्रेमात कोणी आणि कोठेही पडू शकतो. प्रेमाला बंधन नाही. प्रेम कोणावर करावे? यालाही बंधन नाही. मग, सांगा बरं, सर्वात जास्त अफेअर्स कुठे चालतात... शाळा, कॉलेज, हे उत्तर तत्काळ पुढे येईल. पण, थांबा.

नवी दिल्लीः प्रेमात कोणी आणि कोठेही पडू शकतो. प्रेमाला बंधन नाही. प्रेम कोणावर करावे? यालाही बंधन नाही. मग, सांगा बरं, सर्वात जास्त अफेअर्स कुठे चालतात... शाळा, कॉलेज, हे उत्तर तत्काळ पुढे येईल. पण, थांबा. सर्वाधिख अफेअर्स ऑफिसमध्ये चालतात, अशी माहिती एका सर्वेक्षणामधून पुढे आली आहे.

कॅनडामधील एका कंपनीने अफेअर्सचे सर्वेक्षण केले आहे. या सर्व्हेमध्ये 885 कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 45 टक्के जण त्यांचे अफेअर लपवून ठेवतात. 27 टक्के जण त्यांचे अफेअर ऑफिसमध्ये सर्वांपासून लपवून ठेवतात. या सर्व्हेमधील 37 टक्के लोकांनी हे मान्य केले की, कॅनडातील लोक ऑफिसमध्ये त्यांचे अफेअर खासकरून एचआरपासून लपवून ठेवतात. विशेष म्हणजे सर्वाधिक अफेअर्स ही ऑफिसमध्ये चालतात. सर्व्हेमधील 40 टक्के लोकांनी वरिष्ठ आणि व्यवस्थापनाशी संबधितांपासून त्यांचे रिलेशनशिप लपवल्याचे मान्य केले आहे. यामागील कारण देताना त्यांनी सांगितले की, 'ऑफिसमध्ये अशाप्रकारच्या रिलेशनशिपबाबत काही पॉलिसीच नाहीत. 31 टक्के लोकांनी सांगितले की, ऑफिसमध्ये अफेअर न करण्याबाबत ते जागरूक आहेत. कारण त्यांना हे माहीत आहे की, असे केल्यामुळे त्यांची नोकरी जाऊ शकते, असे वृत्त www.hrreporter.com या वेबसाइटने दिले आहे.

कार्लयातील याकर्मचारी हे सतत प्रेमाच्या शोधात असतात, पण ते ही गोष्ट ऑफिसमधील तिसऱ्या व्यक्तीपासून लपवायलाही ते विसरत नाहीत. आपले ऑफिसमधील अफेअर कोणाला कळू नये, ही भावना त्यामागे असते. परंतु, अनेकांच्या नजरेमधून ही गोष्ट सुटत नाही. ऑफिसमधील एक तृतियांश कर्मचारी सोबत काम करणाऱ्या लोकांसोबत रोमान्स करतात, अशीही माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One third of workers finding romance at office