फोंडा येथे अनोळखी महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

तो कुजल्याने त्याची दुर्गंधी बसस्थानकाच्या परिसरात येऊ लागल्याने या मृतदेहाचा छडा लागला. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला

गोवा - फोंडा येथील कदंब बसस्थानकाच्या आवारात निर्जनस्थळी आज सकाळी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह अडगळीत त्यावर पानापाचोळा टाकून झाकण्यात आला होता. तो कुजल्याने त्याची दुर्गंधी बसस्थानकाच्या परिसरात येऊ लागल्याने या मृतदेहाचा छडा लागला. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला मात्र तो ओळखण्यापलिकडे आहे. हा खुनाचा प्रकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे पोलिसांनी सांगितले. राज्यातील पोलिस ठाण्यावर महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली आहे का याचा तपास फोंडा पोलिस करत आहे.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: One Womens dead body found at phonda panji goa