One Plus Nord चा स्फोट; पॅन्टच्या खिशातून फोन काढताना घडली घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

One Plus
One Plus Nord चा स्फोट; पॅन्टच्या खिशातून फोन काढताना घडली घटना

One Plus Nord चा स्फोट; पॅन्टच्या खिशातून फोन काढताना घडली घटना

वनप्लसच्या नॉर्ड सीरिजचे स्मार्टफोन नेहमीच चर्चेत असतात. गेल्या काही महिन्यांमध्ये OnePlus Nord सिरीजमध्ये स्फोट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता आशीच आणखी एक घटना समोर आली आहे. यावेळी OnePlus Nord CE स्मार्टफोनमध्ये स्फोट झाल्याचं समजतंय. दुष्यंत गोस्वामी नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने वनप्लस नॉर्ड सीईमध्ये स्फोट झाल्याचा दावा केला आहे. स्फोट झालेल्या आपल्या फोनचे काही फोटो देखील त्यांनी शेअर केले आहेत.

हेही वाचा: Android फोन झालाय लॉक? या टिप्स वापरून करा अनलॉक

gizmochina च्या रिपोर्टनुसार, यूजरने हा फोन जवळपास 6 महिन्यांपूर्वी विकत घेतला होता. खिशातून फोन काढत असताना त्याचा स्फोट झाला. त्यामूळे ट्विटमध्ये त्याने लिहिले की, "माझ्याकडे अतिशय लोकप्रिय ब्रँड OnePlus चा फोन आहे. One Plus चे फोन फार चांगले असल्याचा दावा कंपनी करते. माझा फोन फक्त 6 महिन्यांपूर्वी घेतलेला आहे आणि काल मी खिशातून काढत असताना त्याचा अचानक स्फोट झाला." हे फक्त वाईटच नाही तर जीवघेणंही आहे. या अपघाताला कंपनी जबाबदार आहे?"

One Plus Blast

One Plus Blast

हेही वाचा: सरकारची व्होडाफोन-आयडियामध्ये 'मालकी'; सर्वाधिक 35.8 टक्के शेअर्स

कंपनीने नवीन फोन देण्याचं आश्वासन दिलं!

रिपोर्टनुसार, ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर गोस्वामी यांनी लिंक्डीनवरही ही घटना पोस्ट केली आहे. तसेच, या घटनेशी संबंधित पोस्ट आता वापरकर्त्याने काढून टाकली असून त्याने सांगितलं की, वनप्लस टीमने त्याला नवीन फोन पाठवण्याचं आश्वासन दिलं आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :mobile
loading image
go to top